मुंबई : १४ फेब्रुवारी हा दिवस अनेकांसाठी महत्त्वाचा असतो. या दिवसाची अनेक तरुण-तरुणी मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. प्रेमाचा दिवस मानल्या जाणाऱ्या या 'व्हॅलेंटाईन्स डे'ला प्रेमवीरांच्या विश्वात खूपच महत्त्व आहे. व्हॅलेंटाईन्स डे ला आपल्या जोडीदारासाठी काय स्पेशल करावे याच्या तयारीत अनेक जण असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजकल तरुण-तरुणी एवढे स्मार्ट झाले आहेत की कोण त्यांना प्रपोज करणार आहे हे त्यांना कळतं. पण अनेक मुली हो म्हणतातंच असं नाही. मुलींसाठी हा खूप मोठा निर्णय असतो. त्यामुळे हो म्हणण्यापूर्वी ते खूप विचार करतात. 


तरुणींनी देखील नकार द्यायचा असल्यास तो व्यवस्थित समजावून द्यायचा. ज्यामुळे मुलगा दुखावला जाणार नाही. जर मुलगा किंवा मुलगी तुमच्यासाठी तुम्हाला योग्य वाटत असेल तरच हो म्हणा. 


प्रत्येक जण वेगवगेळ्या प्रकारे प्रपोज करतात. प्रपोज करणयासाठी  एकांतात, सगळ्यासमोर, डिनरला बोलवून, किंवा एकाद्या सुंदर ठिकाणी जाऊन प्रपोज करणे इंप्रेसिव्ह असू शकते.


व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी मानसिक तयारी चांगली केली पाहिजे. मुलगी नाही म्हटली तर ते जास्त मनाला लावून घेता कामा नये. तुम्ही कसे राहता. कसे कपडे परिधान करता किंवा कोणता टॉप खरेदी करुन देता याला देखील महत्त्व आहे. पण लाल रंगाचं टी-शर्ट किंवा टॉप खरेदी करुन देणे अधिक इंप्रेसिव्ह असू शकतं कारण लाल हा प्रेमाचा रंग मानला जातो.


मुली देखील होकार कसा द्यावा याची तयारी करत असतात. मुली देखील आजकल प्रपोज करतात. त्यामुळे तुम्हाला प्रपोज करायचं आहे तर  चांगले ठिकाण, वेळ आणि पार्टीचं योग्य नियोजन करा.


प्रियकराला किंवा प्रेयसीला काही गिफ्ट द्यायचं याचा आतापासून विचार करा. मुलींना गिफ्ट खूप अॅटरॅक्ट करतात. त्यामुळे तुम्ही काय गिफ्ट देता याला जास्त महत्त्व आहे. ते महागंच असले पाहिजे असे नाही. पण त्यातून तुमच्या भावना समजल्या पाहिजे.


तुमच्या प्रियकराचा विश्वास जिंकण्यासाठी हा चांगला दिवस आहे. फक्त गिफ्टपर्यंत त्याला मर्यादीत राहु देऊ नका. एकमेकांना समजून घ्या. असं केल्यास तुम्ही नक्कीच प्रेमात यशस्वी व्हाल.