मुंबई : सोशल मीडियामध्ये फेसबूक हा मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. फेसबूकची कमाई किती आहे हे तुम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. सध्या फेसबूक भारतात चार पट्टीने कमाई करत आहे. रजिस्ट्रार ऑफ कंपनीनुसार यावर्षी कंपनीच्या कमाईत ४३ टक्क्यांची वाढ  झाली. इकॉनोमिक टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार फेसबूकने यावर्षी 16 रुपये प्रति यूजरच्या दराने १७७ कोटींची कमाई केली तर मागील वर्षी कंपनीने ९ रुपये प्रती यूजरच्या दराने १२३ कोटींची कमाई केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेनंतर फेसबूक सर्वात जास्त भारतात वापरलं जातं. भारतात ६१० रुपये प्रती यूजरच्या दराने फेसबूकने कमाई मोठी कमाई केली. फेसबूक नव्या स्कीम सर्व्हिसच्या माध्यमातून अजून वाढत आहे. उदाहरण म्हणजे, एक्सप्रेस वायफाय सर्विस. याची टेस्टिंग लोकल इंटरनेट सर्विस प्रोवाइडर्ससोबत देखील पूर्ण झाली आहे. यामुळे फेसबूकचा फायदा होता आणि युजर्स देखील वाढतात.


न्यूयॉर्कच्या मार्केट रिसर्च कंपनीने ई मार्केटरनुसार २०१५ मध्ये भारतात काही जाहिरातींच्या १२.६ टक्के डिजिटल मीडियाला दिले. पण २०१७ मध्ये हे वाढून १४.३ टक्के झालं आता ते १ बिलियन डॉलरचा आकडा पार करु शकतात.


डिजिटल मीडियामध्ये जाहिरातीने सोशल मीडिया कंपनिला मोठा फायदा होतो. सोशल मीडियाच्या नावावर भारतात सध्या सर्वात जास्त फेसबूक वापरलं जातं. यामुळे फेसबूकचे युजर्स जसे वाढणार तसे फेसबूकचा फायदा वाढत राहणार आहे.


फेसबूकच्या भारत आणि दक्षिण आशियाच्या मुख्य अधिकारी उमंग बेदी यांनी म्हटलं की, 'भारत फेसबूकच्या वाढत्या बाजारामधलं एक आहे. फेसबूक वापरणाऱ्यांचं प्रमाण भारतात इतर देशांच्या तूलनेत अधिक वाढत आहे.' फेसबूक सॅमसंग, गार्नियर, ओला, फोर्ड आणि ड्यूरेक्स सारख्या कंपन्यांसोबत मिळून कँपेन देखील करतात.