नवी दिल्ली : फेसबूकवर महिलेसोबत मैत्री केली. मात्र, या मैत्रीचा त्याने गैरफायदा घेतला. त्याने आपल्या आजारी आईला भेटायला बोलावले आणि त्याचवेळी लग्नाचे वचन देत त्या महिलेवर रेप केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही महिला दिल्लीतील असून तिला फसवून ग्रेटर नोएडामधील हॉटेलमध्ये बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला. आरोपी युवक दीपक भाटी याने त्याआधी या महिलेबरोबर फेसबूकवर दोस्ती केली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.


पोलिसांनी सांगितले, फेसबूकच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली. भाटी याचा व्यवसाय आहे. तर या महिलेला दोन मुलं आहेत. तर तरुणाला एक मुलगा आहे. दोघांना याबद्दल माहिती होते. त्यानंतर त्यांचे नेहमी बोलणे होत असे. मात्र, या महिलेचा आरोप आहे की, त्याने मला लग्नाचे आमिष दाखवले. २२ मार्चला घरी आजारी आईला बघण्यासाठी बोलावले. त्यावेळी त्याने परी चौकातून कारमधून मला पिकअप केलले. त्यानंतर त्याने एका हॉटेलवर नेले आणि तिथे माझ्यावर रेप केला. त्यानंतर तो पळाला.


त्याला शोधल्यानंतर तो सापडला नाही. त्यानंतर ही बाब तिने आपल्या पतीला सांगितली. त्यानंतर पतीने नॉलेज पार्क कोतवाली पोलीस ठाण्यात ते गेलेत. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर समजले की दीपू चौधरी नावाने त्यांने फेसबूक अकाऊंट आहे. एक दिवस त्याला फेसबुकवर पीडीत महिलेचा फोटो पाहिला आणि फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत राहला. ती स्विकारल्यानंतर दोघांमध्ये चॅट होऊ लागले. त्यानंतर दोघांनी व्हाट्सअॅपवर बोलणे सुरु झाले. यातच ती फसली, अशी बाबत पुढे आलेय.