आत्महत्या रोखण्यासाठी फेसबूक सज्ज
फेसबूकने आत्महत्या प्रतिबंधक (सुसाईड प्रिव्हेंन्शन) असे एक नवे टूल विकसित केले असून, हे टूल नुकतेच भारतात लाँच करण्यात आले. आत्महत्या वेळीच रोखल्या जाव्यात यासाठी फेसबूकने हे पाऊल उचलले आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात लोक एकमेकांना भेटण्यापेक्षा सोशल मीडियावरच जास्त भेटतात. त्यात प्रामुख्याने फेसबूक हे सगळ्यात जास्त नेटिझन्सकडून वापरले जाते. सोशल मीडियावरच आपल्या जीवनातील घडामोडी, अविस्मरणीय क्षण शेअर करतात. आजकाल तर फेसबुकवर मेसेज टाकून आत्महत्या केलेली अनेक प्रकरणे देखील देशात समोर आली होती.
मुंबई : फेसबूकने आत्महत्या प्रतिबंधक (सुसाईड प्रिव्हेंन्शन) असे एक नवे टूल विकसित केले असून, हे टूल नुकतेच भारतात लाँच करण्यात आले. आत्महत्या वेळीच रोखल्या जाव्यात यासाठी फेसबूकने हे पाऊल उचलले आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात लोक एकमेकांना भेटण्यापेक्षा सोशल मीडियावरच जास्त भेटतात. त्यात प्रामुख्याने फेसबूक हे सगळ्यात जास्त नेटिझन्सकडून वापरले जाते. सोशल मीडियावरच आपल्या जीवनातील घडामोडी, अविस्मरणीय क्षण शेअर करतात. आजकाल तर फेसबुकवर मेसेज टाकून आत्महत्या केलेली अनेक प्रकरणे देखील देशात समोर आली होती.
काय नाव आहे त्या टूलचे ?
त्यामुळेच फेसबूकने पुढाकार घेऊन ‘सुसाईड प्रिव्हेंन्शन’हे नवे टूल भारतात लाँच केले. फेसबुकने हे टूल भारतात ‘एएएसआरए’ आणि ‘द लाइव्ह लव्ह लाफ फाऊंडेशन’या स्थानिक कंपन्यांच्या मदतीने सुरू केले आहे. ज्या व्यक्ती तणावात आहेत, अशा व्यक्ती आत्महत्येचा विचार करत असेल आणि तशा पोस्ट टाकत असेल तर त्या पोस्टचा अंदाज घेऊन हे टूल लगेचच त्या व्यक्तीच्या फ्रेन्ड्सना नोटिफिकेशन पाठवते. फेसबूक यूजरच्या पोस्टमध्ये काही विपरीत दिसल्यास ते कळविण्याची सोय या टूलमध्ये करण्यात आली आहे.
याआधी हे टूल अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनमध्ये याआधीच सुरू करण्यात आले होते. फेसबूकच्या या टूलला तिथे चांगला प्रतिसाद मिळाला. आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेणाऱ्यांच्या पोस्टची माहिती घेऊन त्यांना रोखण्यासाठी मदत पोहोचविण्याचे काम फेसबूकच्या टीम्स करत असतात, असे फेसबूकने निवेदनात नमूद केले आहे.