मुंबई : सौदी अरबमध्ये फेसबूक मेसेंजर अॅप्लीकेशनला ब्लॉक करण्यात आलेय. याआधी येथे काही चॅटिंग अॅप्सच्या फीचर्सवर बंदी घाण्यात आलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रिटिश वृत्तपत्र 'द इंडिपेंडेंट'च्या वृत्तानुसार फेसबूक मेसेंजर अॅपच्या व्हिडिओ आणि व्हॉईस चॅटिंगच्या फंक्शन्सने अरब देशाच्या नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे ही बंदी घालण्यात आली आहे. अशा प्रकारची बंदी IMO या अॅपवर वरील नियामानुसार असणार आहे.


मात्र, असे असले तरी या फीचर्सवर का बंदी घालण्यात आलेय ते स्पष्ट करण्यात आलेले नाही. स्थानिक रिपोर्ट्सनुसार सांगितले जात आहे, टेलीकॉप कंपनींच्या वर्चस्वाला धक्का पोहोचू नये म्हणून हे पाऊल उचलण्यात आलेय.


व्हिडिओ आणि व्हाईस कॉलिंग करणाऱ्यांना फोन नेटवर्कच्या जागी इंटरनेट कॉल सुविधा दिली जात आहे. त्यामुळे परदेशात कॉल करण्याचा खर्च कमी होतो. त्याआधी येथे व्हाट्सअॅप आणि व्हायबर इंटरनेट कॉलिंग सुविधाही बंद करण्यात आलेय.