सॅन फ्रान्सिस्को : फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी 'फेसबुक'वर पेजवर लिहिलंय,  फेसबुकच्या 'मेसेंजर' अॅपने आता १ अब्ज युझर्सचा टप्पा गाठला आहे. फेसबुक मेसेंजर हे फेसबुकच्याच कुटुंबाचा एक भाग आहे आणि तेवढ्याच वेगाने या अॅपची लोकप्रियता वाढतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक वेळा आपल्याला फेसबुकवर मेसेज येतात, पण फेसबुक मॅसेंजर अॅप डाऊनलोड केल्याशिवाय त्याला मोबाईलवर वाचणं कठीण होतं, यासाठी फेसबुकने फेसबुक मॅसेंजर हा अॅप तयार केला.फेसबुकने फेसबुक मेसेंजरचं डाऊनलोडिंग वाढवण्यासाठी ही शक्कल लढवल्याचं बोललं जात होतं.


फेसबुकचे उपाध्यक्ष डेव्हिड मॅरकस यांनी म्हटलंय, 'आज आधुनिक युगातील या १ अब्ज युजर्सच्या प्रवासात संवादाच्या माध्यमाला आणखी उत्तम करण्यासाठी आमचे प्रयोग सुरू आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने युजर्सना अधिक चांगल्या पध्दतीने कसा संवाद साधता येईल'.