मुंबई : २०१६ हे वर्ष संपले परंतू या वर्षाने काही नवीन शब्द समाजात प्रचलित केले. काही नवीन शब्द आले आणि त्यांनी लोकांच्या मनावर राज्य केलं. हे शब्द लोकांच्या परवलीचे बनले. याच शब्दांच्या ताकदीमुळे त्यांना कधीही विसरता येणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहू या कोणते आहेत ते शब्द.


ब्रेक्जिट -  हा शब्द ब्रिटेन आणि एक्जिट यांना जोडून तयार केला आहे. याचा अर्थ ब्रिटेनने आपल्या देशात जनमत चाचणीतून निर्णय घ्यावा की युरोपमध्ये रहावं की निघावं.. त्यावेळी ब्रिटेनच्या जनतेने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.


बुर्किनी - हा शब्द बुरखा आणि बिकीन यांना एकत्र करून केला आहे. बुर्किनी एक प्रकारचा स्वीमिंग साठी वापरणारा सूट आहे. त्यात पूर्ण शरीर झाकले जाते. फ्रांसमध्ये बुर्किनी घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे.


प्रोडुनोवा वाॅल्ट - दीपा कर्माकर हिने रियो आॅलंपिक मध्ये ज्या वाॅल्टच्या माध्यमातून अंतिम फेरीत धडक मारली त्याचे नाव प्रोडुनोवा वाॅल्ट. ही वाॅल्ट खूप धोकादायक असून थोडीजरी चूक झाली तरी खेळाडूचा जीव जाऊ शकतो.


कॅशलेस इकॉनॉमी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी ५०० आणि १ हजारची नोट बंद केल्यानंतर कॅशलेस इकॉनॉमीवर अधिक भर दिला आहे. रोकड आपल्याकडे ठेऊ नका, ऑनलाईन व्यवहार करण्याचा मंत्र कॅशलेस इकॉनॉमीच्या माध्यमातून देण्यात आला आहे.


करंसी कॅसेट - नोटबंदीनंतर एटीएम समोर लांबच्या लांब रांगा लागण्यास सुरूवात झाली तर करंसी कॅसेट संदर्भात उत्सुकता वाढली. कारण २ हजारच्या नोटा एटीएमच्या जुन्या कॅसेटमध्ये फिट बसत नव्हत्या.


पनामा पेपर - एक कोटी पेक्षा जास्त संवेदनशील कागदपत्रे जाहीर करण्यात आली. त्यामुळे अनेक दिग्गज व्यक्तींनी कर कशाप्रकारे चुकवला यासंदर्भात पोलखोल झाली. त्यात प्रामुख्याने अमिताभ बच्चन यांचे नाव आले.


नोटबंदी - याला वर्ड ऑफ द इयर म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. ५०० आणि एक हजार नोट बंद केल्यानंतर नोटबंदी हा शब्द प्रचलित झाला. नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था संथ झाली आणि एटीएमबाहेर रांगाच्या रांगा लागल्या.


सर्जिकल स्ट्राईक - भारतीय सैन्यांनी पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्थ केले. कोणालाही कळण्याआधी योग्य वेळी, योग्य ठिकाणी जाऊन मर्यादीत वेळेत कारवाई केल्यामुळे सर्जिकल स्ट्राईक चर्चेत आली. निष्णात डाॅक्टर ज्याप्रमाणे ऑपरेशन करतो. तसेच ऑपरेशन सीमेवरचा दहशतवाद संपवण्यासाठी करण्यात आले.