कमी कपडे वापरण्याचे १० आश्चर्यकारक फायदे...
तुमचं भरलेलं कपड्यांचं कपाट पाहून कदाचित तुम्हाला आनंद होत असेल... की तुमच्याकडे इतके सगळे कपडे आहेत.
मुंबई : तुमचं भरलेलं कपड्यांचं कपाट पाहून कदाचित तुम्हाला आनंद होत असेल... की तुमच्याकडे इतके सगळे कपडे आहेत.
मग, पार्टी असो किंवा ऑफिस... तुम्ही 'वेल ड्रेस्ड' राहाल याची काळजी घेत असाल... पण, तरीही तुम्हाला कपाट उघडल्यानंतर आज कुठला ड्रेस घालायचा हा प्रश्न पडतो का? असा प्रश्न तुम्हाला वारंवार पडल्यामुळे तुमच्या निर्णय क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
अशामध्ये पश्चिमी देशांतील लोकांनी एक नवा प्रोजेक्ट सुरू केलाय... याचं नाव आहे 'प्रोजेक्ट ३३३'... यामध्ये सहभागी लोकांनी आपल्या कपाटात केवळ ३३ कपडे आणि एक्सेसरीज म्हणजेच बूट, बेल्ट वगैरे ठेवण्याची मुभा असते... त्यामुळे बराच वेळ वाचतो... तो कसा पाहुयात...
१. कपाटात कमी कपडे असल्यानं तुमचा बराच वेळ वाचतो.
२. फॅशनेबल कपड्यांमध्ये पैसे खर्च करण्यापेक्षा चांगल्या क्वालिटी कपडे खरेदी करण्याकडे लोकांचा कल वळतो.
३. पाकिटातल्या पैशांची चांगलीच बचत यामुळे होऊ शकते.
४. तुमच्या भावना कपड्यांमध्ये अडकून राहत नाहीत. त्यामुळे तुम्ही लोकांनाही त्यांच्या कपड्यांवरून नाही तर त्यांच्या वागणुकीवरून लक्षात ठेवायला सुरूवात करता.
५. तुम्हाला वारंवार निर्णय घ्यावा लागत नाही. एक टेन्शन कमी होतं.
६. मिक्स अॅन्ड मॅच करण्याची आवड आणि सवय तुम्हाला लागते... त्यामुळे तुम्ही ट्रेन्डीही दिसू लागता.
७. तुम्हाला एकच निर्णय वारंवार घ्यावा लागत असेल तर त्यामुळे तुमच्या निर्णय क्षमतेवरही परिणाम दिसू लागतो.
८. जे कपड्यांच्या बाबतीत दिसतं... तेच तुमच्या इतर कामांतही दिसू लागेल. आयुष्यातील आवश्यक नसलेल्या गोष्टींनाही तुम्ही फाटा देऊ लागता.
९. तुम्ही जास्त स्टायलिश दिसू लागता. तुमची स्टाईल लोकांसाठी फॅशन स्टेटमेंटही ठरू शकतं.
१०. तुमच्या आवडते, चांगल्या क्वालिटीचे आणि स्टायलिश कपडे खरेदी करण्याकडे तुमचा कल वाढू लागतो. त्यामुळे हे कपडे जास्तीत जास्त दिवस टिकतात आणि वारंवार खरेदीही करावी लागत नाही.