मुंबई : अमेरिकेतल्या लोकल मोटर्स कंपनीनं जगातली पहिली थ्रीडी प्रिंटेड मिनीबस बनवली आहे. ओली असं या मिनीबसचं नाव आहे. या बसची यशस्वीरित्या चाचणी करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे ही बस स्वयंचलित म्हणजेच ड्रायव्हरशिवाय चालवण्यात येणार आहे. आयबीएम सुपर कॉम्प्युटरची वॉटसन टेक्नॉलॉजी यासाठी वापरण्यात आली आहे. प्रवासी कुठे जायचं आहे, याचा आदेश बसला देऊ शकतात. जवळपासच्या प्रेक्षणीय स्थळांची माहितीही बसमधली टेक्नॉलॉजी प्रवाशांना देणार आहे. या मिनीबसनंतर थ्रीडी प्रिंटेड टेक्नॉलॉजीच्या मदतीनं विमानही बनवण्यात येणार आहे.