जगातला पहिला क्लाऊड बेस्ड स्मार्टफोन भारतात लॉन्च
जगातील पहिला क्लाऊड बेस्ड स्मार्टफोन `नेक्स्टबिट रॉबिन` भारतात लॉन्च झालाय. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर विक्रिसाठी उपलब्ध आहे.
मुंबई : जगातील पहिला क्लाऊड बेस्ड स्मार्टफोन 'नेक्स्टबिट रॉबिन' भारतात लॉन्च झालाय. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर विक्रिसाठी उपलब्ध आहे.
या फोनचं वैशिष्ट्य म्हणजे, याची बनावट आणि यामध्ये दिलं जाणारा १०० जीबीचं क्लाऊड स्पेस... तसंच यामध्ये ऑटोमॅटिक अपलोडिंगची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे, तुम्ही जेव्हा वाय-फायला कनेक्ट व्हाल तुमचा सगळा डेटा आपोआप तुमच्या खाजगी क्लाऊड स्पेसमध्ये स्टोअर होऊन जाईल. तसंच यात फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आलाय.
'नेक्स्टबिट रॉबिन'ची वैशिष्ट्यं...
प्रोसेसर : क्वालकॉम हेक्साकोर स्नॅपड्रॅगन ८०८
रॅम : ३ जीबी
रिअर कॅमेरा : १३ मेगापिक्सल
फ्रंट कॅमेरा : ५ मेगापिक्सल
डिस्प्ले : ५.२ इंच फूल एचडी (१९२० X १०८०)
मेमरी : ३२ जीबी इंटरनल, १०० जीबी, क्लाऊड स्टोअरेज
कनेक्टिव्हिटी : LTE, 3G, Wi-Fi
बॅटरी : २८६० मेगाहर्टझ
ऑपरेटिंग सिस्टम : अॅन्ड्रॉईड मार्शमॅलो
या फोनची किंमत आहे १९,९९९ रुपये