मुंबई : स्मार्टफोन घेण्याच्या विचारात आहात ती ही तुमच्यासाठी योग्य वेळ ठरणार आहे. देशातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने जबरदस्त एक्सचेंज ऑफर आणला आहे. सॅमसंग गॅलेक्सी J5 (2016) वर 10,000 रुपयापर्यंत डिस्काऊंट दिला जाणार आहे. या फोनची किंमत बाजारात 11,990 रुपये आहे. पण जर तुम्ही हा स्मार्टफोन या ऑफरनुसार खरेदी केला तर तुम्हाला फक्त 1,990 रुपये द्यावे लागणार आहेत. ही एक्सचेंज ऑफर सॅमसंगच्या इतर मोबाईल फोनवर लागू असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


गॅलेक्सी J5चे फिचर्स


गॅलेक्सी J5मध्ये 5.2 इंचाची फूल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. अँड्राईड मार्शमेलोवर चालणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये 2जीबी रॅम आणि 16 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी १३ एमपी रेअर कॅमेरा आणि ५ एमपी फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोमध्ये 3100 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. याची मार्केटमध्ये किंमत 11,990 रुपये आहे. 


गॅलेक्सी On7 वर 8000 रुपयांचा डिस्काउंट


फ्लिपकार्टने गैलेक्सी On7 वर देखील ऑफर दिली आहे. फक्त 990 रुपयात तुम्हाला हा फोन मिळणार आहे. या स्मार्टफोनची किंमत  ८,९९० रुपये आहे. 5.5 इंच फूल एचडी डिस्प्ले,1.5 जीबी रॅम आणि 8 जीबी इंटरनेल मेमरी यामध्ये देण्यात आली आहे. 13 एमपी रेअर आणि ५ एमपी फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.