नवी दिल्ली :   भारतात २५१ रुपयात लॉन्च झालेल्या स्मार्टफोन फ्रीडम २५१ने सर्व बाजारात खळबळ माजवली आहे. या फोनच्या किंमतीने ग्राहकांना मोहिनी घातली तर सरकारमधील काही जणांनी याला धोकाधडीचा आरोप लावला. आता आरोप लावणाऱ्यांना फ्रीडमने सडेतोड उत्तर दिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता स्मार्टफोन फ्रीडम २५१ कॅश ऑन डिलिवरीद्वारे ग्राहकांना घऱपोच पोहचविण्यात येणार आहे. मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार रिंगिंग बेल्सने आपल्या फेसबूक पेजवर सांगितले की, प्रथम ५० लाख लोकांना हा फोन मिळणार आहे. यातील २५ लाख युजर्सला ऑनलाइन आणि २५ लाख युजर्सला ऑफलाइन हा फोन मिळणार आहे. 


पहिल्यांदा रिजिस्ट्रेशन करणाऱ्या २५ लाख जणांना फोन उपलब्ध होणार आहे. ग्राहक हे पेमेंट मोबाईल घरी मिळाल्यानंतर देऊ शकतात.