माय जिओ अॅप अपडेट न केल्यास येऊ शकतात या अडचणी
जिओची वेलकम ऑफर ऑटोमॅटिक हॅप्पी न्यू ईयर ऑफरमध्ये कन्वर्ट
मुंबई : १ जानेवारी, २०१७ म्हणजेच वर्षाच्या पहिल्याच दिवशी रिलायंस जिओची वेलकम ऑफर ऑटोमॅटिक हॅप्पी न्यू ईयर ऑफरमध्ये कन्वर्ट होणार आहे. ५ सप्टेंबर २०१६ ला जिओने लॉन्चिंग सोबत फ्री वेलकम ऑफर सुरू केली होती. ही ऑफर ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत होती.
१ डिसेंबर २०१६ ला मुकेश अंबानींनी ही ऑफर हॅप्पी न्यू ईयर ऑफरमध्ये कन्वर्ट करत ३१ मार्चपर्यंत ती फ्रीमध्ये दिली जाणार असल्याचं जाहीर केलं होतं. म्हणजेच आता वेलकम ऑफर हॅप्पी न्यू ईयरमध्ये कन्वर्ट झाली आहे. पण यूजर्सला या ऑफरशी संबंधित काही अपडेट करणे गरजेचं आहे. जर अपडेट नाही केलं तर काही अडचणी तुम्हाला येऊ शकतात.
जिओ यूजर्सला 'माय जिओ' अॅप अपडेट करावं लागेल. अपडेट न केल्यास व्हिडिओ कॉलिंगमध्ये अडचणी येऊ शकतात. अपडेट न केल्यास तुम्हाला इंटरनेटची स्पी़ड देखील कमी मिळू शकते.