बीजिंग : जगात आयफोनचे अनेक चाहते आहेत. अनेकांना आयफोनबाबत खूपच आकर्षण आहे. पण कोणी स्वत:च्या कुत्र्यासाठी कोणी 8 आयफोन घेतल्याचं तुम्ही ऐकलं आहे. हो पण हे सत्य आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनमधील श्रीमंत गृहस्थ वांग जियालिन यांचा मुलगा वांग सिकॉन्ग यांने त्याच्या कुत्र्यासाठी 1, 2 नव्हे तर जवळपास 8 आयफोन 7s खरेदी केले आहे. याची किंमत जवळपास 9584 डॉलर आहे. म्हणजेच जवळपास 6.50 लाख रूपये. वांग जियालिन चीनमध्ये डलियन वांडा ग्रुपचे चेअरमेन आहेत.


वांग याने सोशल मीडियावर कुत्र्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. सध्या आयफोन 7 एसची किंमत 80 हजार रुपये आहे.