नवी दिल्ली : मोबाईल फोन आणि इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी अच्छे दिन येणार आहेत. सरकारने स्पेक्ट्रम यूजेस चार्जेस (एसयूसी) कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने मोबाइल सर्विस ऑपरेटर्सकडून एडजस्टेड ग्रॉस रेवेन्यू मध्ये ५ टक्के रक्कम स्पेक्ट्रम चार्जेसची घेत होती. सरकारने हे चार्जेस आता ३ टक्के केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोबाईल वापरणाऱ्या आणि खास करुन इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक गोष्ट आहे. जुलै महिन्यात सरकार ७ फ्रीक्वेंसीजवर 2,000 मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रमची निलामी करणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मोबाईल कंपन्यांना जवळपास 3,200 कोटींचा फायदा होणार आहे.


टेलिकॉम कमीशनने देखील एसयूसीचे चार्जेस कमी करण्यासाठी मंजुरी दिली आहे. तर सूचना आणि प्रसारण मंत्र्यांनी देखील या निर्णयाला हिरवा कंदील दाखवला आहे.