होंडा कंपनीने ५७,००० कार माघारी बोलविल्यात
होंडा या कंपनीने भारतातून जानेवारी २०१२ ते जून २०१३ दरम्यानच्या काही गाड्या पुन्हा माघारी घेतल्यात. होंडी सिटी, जॅज, सिव्हिक आदी मॉडेलच्या ५,६७६ गाड्या परत मागविल्यात आहे. सुरक्षितेच्या कारणामुळे या गाड्या कंपनीने माघारी घेतल्यात.
नवी दिल्ली : होंडा या कंपनीने भारतातून जानेवारी २०१२ ते जून २०१३ दरम्यानच्या काही गाड्या पुन्हा माघारी घेतल्यात. होंडी सिटी, जॅज, सिव्हिक आदी मॉडेलच्या ५,६७६ गाड्या परत मागविल्यात आहे. सुरक्षितेच्या कारणामुळे या गाड्या कंपनीने माघारी घेतल्यात.
होंडा देशातील एक प्रमुख कंपनी आहे. होंडा ही कंपनी जपानस्थित आहे. कंपनीने तीन मॉडेल कार सुरक्षता कारणामुळे माघारी घेतल्यात. यामध्ये एअरबॅग खराब असल्याने त्या बदलून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी कंपनीने विक्री केलेल्या कार पुन्हा मागे घेण्याचा निर्णय घेतलाय.
कंपनी खराब एअरबॅक विनामोबदला बदलून देणार आहे. होंडाने २०१५ मध्ये जवळपास २.२४ लाख कार माघारी घेतल्या होत्या. यात होंडा सीआरव्ही, सिटी आणि जाझ यांचा समावेश होता. होंडीही एकमेव कार कंपनी नाही. याआधी अनेक कंपनीने आपल्या गाड्या माघारी बोलविल्या होत्या. फॉक्सवॅगननेही कार परत बोलाविल्या होत्या.