होंडाची पहिली `मेड इन इंडिया` WR-V लॉन्च
होंडा कार्स इंडिया लिमिटेडनं आपली नवी कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हर कार WR-V लॉन्च केलीय.
नवी दिल्ली : होंडा कार्स इंडिया लिमिटेडनं आपली नवी कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हर कार WR-V लॉन्च केलीय.
होंडाच्या या नव्या गाडीची निर्मिती राजस्थानच्या टपूकडा प्लान्टमध्ये होतेय. कंपनीच्या म्हणण्यानुसार ही संपूर्णत: 'मेड इन इंडिया' अशी पहिली-वहिली गाडी आहे.
कंपनीनं ही कार पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही प्रकारांत तब्बल 6 कलर्समध्ये बाजारात आणलीय. पेट्रोल इंजिन कारचं मायलेज 17.5 kmpl तर डिझेल व्हर्जनचं मायलेज 25.5 kmpl पर्यंत मिळू शकेल, असा दावा कंपनीनं केलाय.
या गाडीत सेफ्टी फिचर्ससहीत अॅन्टी लॉक ब्रेकिंग सिस्टम तसंच इलेक्ट्रॉनिक ब्रेकिंग सिस्टमचे फिचर्स जोडले गेलेत. सोबतच ड्युएल एअरबॅग दिलं गेलंय.
या कारची किंमत 7.75 पासून 9.99 लाख रुपयांपर्यंत (एक्सशोरुम) आहे.
Honda WRV
S petrol - Rs 7.75 lakh
VX petrol - Rs 8.99 lakh
S diesel - Rs 8.79 lakh
VX diesel - Rs 9.99 lakh