मुंबई : बहुतेकवेळा अनेकजण आपल्या मोबाईलचा पासवर्ड किंवा लॉक पॅटर्न विसरून जातात. यामुळे मोबाईल सुरु करण्यासाठी तुम्हाला सॉफ्टवेअर शॉप किंवा मोबाईलच्या दुकानात जावं लागतं. यासाठी पैसेही खर्च करावे लागतात. पण पासवर्ड विसरला असाल तर घर बसल्यावरही फोन अनलॉक करता येतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1 फोनचा लॉक पॅटर्न किंवा लॉक विसरलात तर सगळ्यात आधी फोन स्विच ऑफ करा. जवळपास एक मिनीटापर्यंत हा फोन स्विच ऑफ ठेवा. 


2 यानंतर फोनचं व्हॉल्यूम बटण, होम स्क्रीन बटण आणि पॉवर बटण एकत्र दाबा. ही तिन्ही बटणं एकत्र दाबल्यानंतर तुमच्या फोनवर लाईट लागेल. 


3 यानंतर तुमच्या मोबाईल स्क्रीनवर पाच ऑप्शन येतील. 


• Reboot data


• Wipe data/ factory reset


• Install update


• Power down


• Advanced option


4 या ऑप्शनपैकी दुसरा ऑप्शन म्हणजेच Wipe data/ factory reset वर क्लिक करा. 


5 यानंतर फोन रिस्टार्ट करा. तुमच्या फोनमधून पासवर्ड आणि पॅटर्न लॉक गेलेलं असेल. 


ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमच्या मोबाईलमधला सगळा डेटा खाली होईल. तुमच्या मोबाईलमधले फोटो, व्हिडिओ, मेसेज, कॉन्टॅक्ट्स सगळं डिलीट होईल. त्यामुळे फोन फॅक्ट्री रिसेट करताना विचार करा.