आयडियाची सर्वांसाठी इंटरनेट सुविधा, मिळणार फ्री इंटरनेट
इंटरनेटचा वापर न करणाऱ्या लाखो ग्राहकांसाठी दूरसंचार कंपनी आयडियाने बुधवारी सर्वांसाठी इंटरनेट या योजनेची सुरुवात केलीये. या योजनेअंतर्गत प्रीपेड ग्राहक आणि इंटरनेटचा वापर न करणाऱ्या यूजर्सला एका महिन्यासाठी १०० एमबी डेटा फ्री मिळणार आहे.
मुंबई : इंटरनेटचा वापर न करणाऱ्या लाखो ग्राहकांसाठी दूरसंचार कंपनी आयडियाने बुधवारी सर्वांसाठी इंटरनेट या योजनेची सुरुवात केलीये. या योजनेअंतर्गत प्रीपेड ग्राहक आणि इंटरनेटचा वापर न करणाऱ्या यूजर्सला एका महिन्यासाठी १०० एमबी डेटा फ्री मिळणार आहे.
ही सेवा मिळवण्यासाठी ग्राहकांना *756# डायल करावे लागेल अथवा 56756 या नंबरवर IF असा एमएमएस पाठवावा लागेल.
दिवसाला इंटरनेटचे जाळे विस्तारत आहे. त्यामुळे जे ग्राहक इंटरनेट वापरत नाहीत त्यांना त्या सेवेशी जोडण्यासाठी आयडिया हे पाऊल उचलत असल्याचे आयडियाचे सेल्युलरचे अधिकारी शशी शंकर यांनी सांगितले.