महिलांसाठी खासगी वापरासाठी महत्वाचे गॅझेट
चार असे गॅझेट आहेत की, त्याचा जोरदार झटका लागल्यावर महिलांच्या जवळ कुणी येत नाही, हे गॅझेट महिलांच्या सुरक्षेसाठी खूप महत्वाचे मानले जात आहेत.
मुंबई : चार असे गॅझेट आहेत की, त्याचा जोरदार झटका लागल्यावर महिलांच्या जवळ कुणी येत नाही, हे गॅझेट महिलांच्या सुरक्षेसाठी खूप महत्वाचे मानले जात आहेत.
सेलफोन स्टन गन
सेलफोन सारखा दिसणारा पण कमाल करणारा एक गॅझेट आहे, जो तुम्हाला जोराचा झटका देऊ शकतो, वाईट नजर ठेवणाऱ्या माणसाला हा झटका एकदा जरी बसली तरी तो पुढच्या वेळेस, तुमच्याकडे पाहणारही नाही.
पर्सनल अलार्म
हा स्मार्ट पर्सनल अलार्म आहे. कोणतंही संकट आल्यास युवती आपल्या आजूबाजूच्या व्यक्तीला बोलवू शकतात.
लिपस्टिक सर्वच महिलांकडे असते, लिपस्टिक सारखा दिसणारा हा गॅझेट असला, तरी शत्रूला फार मोठा झटका देऊ शकतो.
एमरजन्सी ब्रा
एमरजन्सी ब्रा असा असतो, ज्याचा गॅस मास्क तयार होतो, या ब्रामुळे तुम्हाला केमिकल्स हल्ल्यापासून वाचता येऊ शकतं.
स्टनगन फ्लॅश लाइट
ही स्टनगन हल्लेखारांची चांगलीच वाट लावते. स्टन गनचं जोरदार करंट लागतं.