मुंबई : रिलायंस जिओच्या प्राइम मेंबरशिप प्लान आजपासून सुरु होत आहे. कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी याची काही दिवसांपूर्वीच घोषणा केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्लॅननुसार ग्राहक ३१ मार्च २०१८ पर्यंत जिओ हॅप्पी न्यू ऑफरचा फायदा घेऊ शकतात. जिओची ही मेंबरशिप ऑफर घेण्यासाठी ९९ रुपये मोजावे लागतील. जे एक वर्षासाठी असेल त्यानंतर ३०० रुपये प्रतिमहिना तुम्हाला भरावे लागतील. 


इतर प्राईम ग्राहकांसाठी जिओ फ्री सर्विस अजून एक वर्षासाठी वाढवण्यात आली आहे. १ मार्च ते ३१ मार्चपर्यंत इतर ग्राहकांना रजिस्ट्रेशन करावं लागेल. ग्राहकांना Myjio App, jio.com आणि रिलायंस स्टोर्सवर जाऊन हे रजिस्‍ट्रेशन करता येईल. रजिस्ट्रेशनसाठी ९९ रुपये भरावे लागतील. त्यानंतर पुढील १२ महिने फ्री सर्विसची सुविधा मिळेल.
 
ही मेंबरशिप १ एप्रिल २०१७ पासून लागू होईल. ज्या जिओ यूजर्सने वेळेत ही सेवा सब्सक्राइब नाही केली त्यांचं नंबर प्रीपेड किंवा पोस्टपेड कनेक्शनमध्ये बदलला जाईल. मग त्यांना बिल प्लॅन नुसार किंवा रिचार्ज नुसार पैसे भरावे लागतील.