मुंबई : रिलायन्स जिओने प्राईम मेंबरसाठी मुदत 15 एप्रिलपर्यंत वाढवली आहे. सोबतच जिओने समर सरप्राइज ऑफरची देखील घोषणा केली आहे. पण यानंतर जियो यूजर्सच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत असतील. कारण बोललं जातंय की यानंतर 3 महिन्यासाठी सर्विस फ्री मिळणार आहे. पण फ्री काहीही नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

99 रुपये, 303 रुपये किंवा 149 रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर आता काय होणार हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.


समर सरप्राईज ऑफर काय आहे ? 


समर सरप्राइज ऑफरनुसार फ्री सर्विस तीन महिने वाढवण्यात आली आहे. पण याच्या काही अटी आहेत. अट अशी आहे की, जर तुम्ही घोषणेआधी प्राईम मेंबरशीप घेतली असेल आणि 303 रुपयांचं रिचार्ज केलं असेल तर ते जुलै 2017 पासून लागू होणार आहे. याआधी तीन महिने सर्विस डेटा  आणि कॉलिंग मिळत राहिल. तीन महिन्यानंतर 303 रुपयांचा पॅक सुरु होईल.


फक्त 303 रुपयांच्या पॅकवर असणार समर सरप्राईज ऑफर


समर सरप्राईज ऑफर फक्त त्या कस्टमर्ससाठी आहे ज्यांनी प्राईम सर्विस घेऊन 303 रुपयांचा रिचार्ज केला आहे. जर तुम्ही प्राईम मेंबरशिप घेऊन 149 रुपयांचा रिचार्ज केला असेल तर जिओ अॅपच्या माध्यमातून तुम्हाला पुन्हा 303 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. म्हणजेच जर तुम्हाला फ्री ऑफर पाहिजे असेल तर 99 रुपयांच्या सब्सक्रिप्शननंतर  303 रुपयांचं रिचार्ज करणे आवश्यक आहे. जर 149 रुपयांच्या पॅक सोबत रिचार्ज करता तर तुम्हाला स्टँडर्ड टेरिफ मिळणार आहे.