या डोसावाल्याकडे कधीतरी आयकर विभागाने धाड टाकली होती...
घाटकोपरमधील विजय रेड्डी यांचा जिन्नी डोसा अतिशय प्रसिद्ध आहे. साई स्वाद डोसा या नावाने ७३ वर्षीय विजय रेड्डी यांचा डोसा स्टॉल आहे.
मुंबई : घाटकोपरमधील विजय रेड्डी यांचा जिन्नी डोसा अतिशय प्रसिद्ध आहे. साई स्वाद डोसा या नावाने ७३ वर्षीय विजय रेड्डी यांचा डोसा स्टॉल आहे. विजय रेड्डी यांच्याकडे ४५ प्रकारचे डोसे मिळतात. त्यांच्याकडे ३० रूपयांपासून १६० रूपयाचा डोसा मिळतो, पण कमी किमतीचे डोसे जास्त मागितले जातात, यातील जिन्नी डोसा सर्वात प्रसिद्ध आहे.
आठ तवे एकाच रांगेत स्टॉलवर लावलेले असतात. विजय रेड्डी यांच्याकडे २४ तरूण काम करतात, विजय रेड्डींना हे मुलासारखेच आहेत, त्यांचा पगारासह सर्व खर्च विजय रेड्डी पाहतात. विजय रेड्डी हे १० बाय १० च्या घरात राहतात.
विजय रेड्डी यांच्याकडे आयकर विभागाने धाडही टाकली होती. पण विजय रेड्डी यांना लोकांना खाऊ घालण्यात आणि या २४ लोकांना रोजगार देण्यात रस असल्याचं सिद्ध झालं. ४ महिने विजय रेड्डी यांचा व्यवसाय पावसामुळे बंद असतो. बीएमसी आणि पोलिसांच्या जाचापासून विजय रेड्डी सुटलेले नाहीत.