मुंबई: भारतामध्ये स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीवरून ही गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्मार्टफोन वापराच्या यादीमध्ये भारतानं आता अमेरिकेलाही मागे टाकलं आहे. या यादीमध्ये भारत नंबर 2 वर आहे, तर चीन अव्वल स्थानावर कायम आहे. 


काऊंटर पॉईंटनं केलेल्या रिसर्चनुसार भारतात स्मार्टफोनचं मार्केट 100 मिलीयन पर्यंत गेलंय. स्मार्टफोन मार्केटची ही वाढ प्रत्येक वर्षी 23 टक्के असल्याचंही या रिसर्चमध्ये समोर आलं आहे.  तर ऑनलाईन स्मार्ट फोन विकत घेणाऱ्यांची संख्येमध्येही लक्षणीय वाढ झालेली आहे. 2015च्या शेवटच्या तिमाहीमध्ये 33 टक्के स्मार्ट फोन हे ऑनलाईन विकले गेले आहेत.


तर स्मार्टफोन कंपनींच्या मार्केट शेअरमध्ये सॅमसंग 23 टक्क्यांबरोबर एक नंबरला आहे, तर मायक्रोमॅक्स 18 टक्के मार्केट शेअरमुळे 2 नंबरवर आहे.