नवी दिल्ली : स्मार्टफोन उत्पादक कंपनी इनफोकसने बिंगो सीरिजमध्ये नवा स्मार्टफोन लाँच केलाय. याची किंमत केवळ साडेसात हजार रुपये इतकी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईकॉमर्स वेबसाईट स्नॅपडीलवर याची रजिस्ट्रेशन सुरु झालं आहे. २१ मार्चला या स्मार्टफोनचा पहिला सेल होणार आहे. 


बिंगो ५० असं या स्मार्टफोनचे नाव आहे. यात पाच इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आलाय. १.३ गिगाहर्टझ मीडियाटेक क्वाडकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. यात तीन जीबी रॅम आणि १६ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आलीये. 


यात ८ मेगापिक्सेल रेयर आणि फ्रंट कॅमेरा आहे तर अँड्रॉईड ६.० मार्शमेलो आहे.