ह्युस्टन : मायक्रोप्रोसेसर उत्पादक कंपनी इंटेलने अंतर्गत पुनर्रचनेची मोठी मोहीम हाती घेतली आहे. ही मायक्रोप्रोसेसरमधील जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. याअंतर्गत १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येणार आहे. कंपनीच्या या निर्णयाने आयटी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या क्षेत्रात वाढीची गती धीमी झाली आहे. पर्सनल कॉम्प्युटर बाजारावरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न आहे, म्हणून ही कर्मचारी कपात करण्यात येणार आहे. 


अनेक वर्षांपूर्वी इंटेलने पर्सनल कॉम्प्युटर क्षेत्रावर मोठा डाव लावला होता.  नियोजित कार्यक्रमानुसार, २०१७ पर्यंत इंटेल ११ टक्के कर्मचाऱ्यांना घरी पाठविणार आहे. 


ही प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येणार आहे. ज्यांना काढण्यात येणार आहे, त्या कर्मचाऱ्यांना आगामी ६० दिवसांत त्यासंबंधीची नोटीस देण्यात येणार आहे.