मुंबई : अॅपलनं ग्राहकांसाठी खुशखबर दिली आहे. ऍपलनं काही मोबाईल हँडसेट्सच्या किमती कमी केल्यात. थोडी थोडकी नाही तर तब्बल 22 हजारांनी या किमती कमी करण्यात आल्यात. आय फोन सिक्स एस साठ हजारांना उपलब्ध आहे. थेट 82 हजारांवरून सिक्स एसची किंमत साठ हजारांवर आणली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयफोन सिक्स एस प्लस आता सत्तर हजारांमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्ट फोनच्या किमतीही थेट 22 हजारांनी कमी करण्यात आल्यात. आयफोन सेव्हन आणि आयफोन सेव्हन प्लस लॉन्च केल्यानंतर काही दिवसांतचं भारतात या आयफोन सिक्स एस, आयफोन सिक्स प्लसच्या किंमती कमी करण्यात आल्यात.