रँग्लर आणि ग्रॅन्ड चेरकीसह अमेरिकन `जीप` भारतात दाखल
मोठ्या कार बनवण्यासाठी ओळखली जाणारी अमेरिकेची `जीप` अखेर पुन्हा एकदा भारतात दाखल झालीय.
मुंबई : मोठ्या कार बनवण्यासाठी ओळखली जाणारी अमेरिकेची 'जीप' अखेर पुन्हा एकदा भारतात दाखल झालीय.
'पॉप्युलर ब्रॅन्ड' असलेल्या 'जीप'नं भारतात आपल्या दोन फ्लॅगशिप गाड्या 'रँग्लर' आणि 'ग्रॅन्ड चेरकी' लॉन्च केल्यात.
'जीप'ची रिएन्ट्री
जवळपास ७० वर्षानंतर 'जीप'नं भारतात रिएन्ट्री घेतलीय. या अगोदर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जीप विक्रीसाठी भारतात दाखल झाली होती.
तीन वर्षांपूर्वीही 'जीप'नं आपण भारतात दाखल होणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर आता कंपनीनं जोधपूरमध्ये आपली ग्लोबल फ्लॅगशिप एसयूव्ही 'रँग्लर' आणि 'ग्रॅन्ड चेरकी' लॉन्च केली.
काय आहे किंमत
रँग्लरची किंमत ७१.५९ लाख रुपये तर ग्रॅन्ड चेरकीची किंमत ९३.६४ लाख रुपयांपासून (एक्स शोरुम किंमत, दिल्ली) सुरू होते.
जीप रँग्लर
रँग्लर 'रग्ड व्हेईकल' आहे. ही गाडी १९८६ पासून बनवली जात आहे. भारतात मात्र याचा लॉन्ग व्हीलबेस असणारं मॉडल 'अनलिमिटेड' हेच विक्रीसाठी उपलब्ध असेल.
या मॉडलमध्ये २.८ लीटरचा ४ सिलिंडर टर्बोचार्ज्ड डीझेल इंजिन आहे. जे २०० PS ची पॉवर आणि ४६० Nm चा टॉर्क देतं.
यामध्ये ५ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे. त्यामुळे ऑफरोड ड्रायव्हिंगसाठी या गाडीचा अनुभव शानदार ठरतो.