मुंबई : जिओ यूझर्ससाठी धन धना धन ऑफर अंतर्गत रिचार्ज करण्याची अखेरची तारीख १५ एप्रिल होती. तरीही रिचार्ज करण्याची संधी देण्यात येत आहे, कारण अनेक ग्राहकांनी जिओच्या ऑफरकडे तोंड फिरवले आहे, हे देखील नाकारता येत नाही, दुसरीकडे व्होडाफोन आणि एअरटेलनेही नेटच्या जबरदस्त ऑफर देणे सुरू केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या यूजर्सनी जिओचे रिचार्ज केलेले नाही त्यांना, माय जिओ अ‍ॅप, तसेच जिओच्या वेबसाईटवर आणि जिओ स्टोरवर जाऊन रिचार्ज करता येणार आहे. मात्र जर तुम्ही एकही रिचार्ज केलं नसेल तर तुमचं सिमकार्ड बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


जर तुम्ही आतापर्यंत या ऑफरसाठी रिचार्ज केलेले नसेल तर ४०८ रुपयांचे रिचार्ज (९९+३०९) करुन ही ऑफर मिळवू शकता. आतापर्यंत कंपनी आपल्या वेबसाईटसहित माय जिओ अ‍ॅपवर प्राईम सबस्क्रीप्शन आणि धन धना धन ऑफर मिळवण्याची संधी देत आहे.


जिओ प्राइम मेंबरशिप मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर काही दिवसातच रिलायन्सने ग्राहकांसाठी धन धना धन ही ऑफर आणली होती. पण अनेक ग्राहकांनी आत्ता पर्यंत एकही रिचार्ज न केल्याने कंपनी अशा ग्राहकांची सेवा बंद करण्याच्या तयारीत आहे. 


या साठी काही दिवसांची मुदत देत कंपनीकडून रिचार्जसाठी मेसेज वा कॉलद्वारे अलर्ट पाठवले जात आहेत. इतकचं नव्हे तर धन धना धन या ऑफरमुळं जिओने टिसीएस सारख्या कंपनीला मागे सारलं आहे.