तुमचा हक्क : एटीएम कार्डावर तुम्हाला मिळतो 5 लाखांचा `इन्शुरन्स`
तुमच्यापैंकी अनेकांकडे सरकारी किंवा गैर सरकारी बँकांचं एटीएम कार्ड असेल... या एटीएम कार्डावर तुम्हाला तब्बल 5 लाखांचा इन्शुरन्स कार्ड घेतल्या घेतल्या आपोआप मिळतो.
मुंबई : तुमच्यापैंकी अनेकांकडे सरकारी किंवा गैर सरकारी बँकांचं एटीएम कार्ड असेल... या एटीएम कार्डावर तुम्हाला तब्बल 5 लाखांचा इन्शुरन्स कार्ड घेतल्या घेतल्या आपोआप मिळतो.
एखाद्या अपघातानंतर हा इन्शुरन्स तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांसाठी फायदेशीर ठरतो. परंतु, एटीएम कार्ड वापरणाऱ्या बहुतेकांना ही माहिती नसते... त्यामुळे ते बँकेकडे आपल्या हक्काचे 'इन्शुरन्स'चे पैसे मागत नाहीत. बँकाही सोयिस्करपणे या स्कीमची माहिती ग्राहकांपर्यंत पोहचू देत नाहीत.
5 लाखांपर्यंतचा विमा
तुमच्याकडे कोणत्याही बँकेचं एटीएम कार्ड असेल तर तुमचा दुर्घटना विमा तुमच्या बँकेकडे तुम्ही काढलाय असं समजा.... हा विमा 25 हजारांपासून 5 लाखांपर्यंतचा असतो. ही योजना कित्येक वर्षांपासून सुरू आहे परंतु 90-95 टक्के लोकांना या योजनेची माहिती नाही.
विमा प्रक्रिया
- या योजनेनुसार कोणत्याही एटीएम धारकाचा एखाद्या दुर्घटनेत मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांना पुढच्या 2 ते 5 महिन्यांपर्यंत एटीएम धारकाच्या बँक अकाऊंट असलेल्या ब्रान्चमध्ये संपर्क साधावा लागतो.
- विम्याची रक्कम मिळवण्यासाठी एक अॅप्लिकेशन बँकेत सादर करावं लागतं.
- नुकसान भरपाई देण्यापूर्वी बँक व्यक्तीच्या मृत्यूपूर्वी 45 दिवसांपर्यंत त्याच्या एटीएममधून कोणत्याही प्रकारची वित्तीय देव-घेव झाली नाही ना, याची खातरजमा करून घेते.
या योजनेचे फायदे
- योजनेनुसार, आंशिक अपंगत्वापासून ते मृत्यूपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची नुकसान भरपाई मिळते. यासाठी एटीएम धारकाला कोणत्याही स्वरुपात पैसे भरावे लागत नाहीत.
- जर तुमच्याकडे साधारण एटीएम असेल तर एक लाखांपर्यंतची नुकसान भरपाई तुमच्या कुटुंबीयांना मिळेल. जर मास्टर कार्ड असेल तर ही नुकसान भरपाई 2 लाखांपर्यंत असू शकेल.
- सर्व वीजा कार्डांवर 2 लाखांपर्यंत आणि मास्टर मित्र कार्डावर 25 हाजार रुपयांचा विमा असतो. तर प्लॅटिनम कार्डावर 2 लाख रुपये, मास्टर प्लॅटिनम कार्डावर 5 लाखांपर्यंतचा विमा तुम्हाला बँकेकडून मिळू शकतो.
- आंशिक अपंगत्वात जर एका पायाला किंवा हाताला दुखापत झाली असेल तर बँकेकडून 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळू शकेल. दोन्ही हात किंवा दोन्ही पाय गमावले असल्यास एक लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळू शकते.
तुमचे हक्क समजून घ्या...
या योजनेची माहिती तुमच्या बँकेत फोन करून खात्री करून घ्या... याची माहिती देण्यास बँकेच्या कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ केल्यास तुम्ही याची तक्रार दाखल करू शकता.
नुकसान भरपाई देण्यास बँकेनं नकार दिला तर तुम्ही ग्राहक न्यायालयात दाद मागू शकता.