COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : काही दिवसांपूर्वीच लेईको कंपनीने लाँच केलेल्या लेईको ली मॅक्स2 या स्मार्टफोनच्या किंमतीत तब्बल 5000 रुपयांची कपात केलीये. भारतात आता हा 4 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल मेमरी असलेला स्मार्टफोन 17,999 रुपयांमध्ये तुम्ही खरेदी करु शकता.


कंपनीने हा स्मार्टफोन लाँच केला तेव्हा याची किंमत 22,999 रुपये इतकी होती. मात्र आता 2 ते 6 ऑक्टोबरदरम्यान तुम्ही हा स्मार्टफोन 17,999 रुपयांत खरेदी करु शकता.


हे आहेत लेईको ली मॅक्स 2चे फीचर्स


5.7 इंचाचा डिस्प्ले
32 जीबी इंटरनल मेमरी आणि 4 जीबी रॅम
क्वाड कोर क्वालमन स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर
21 मेगापिक्सेल रेयर कॅमेरा
8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
3100एमएएच बॅटरी


किंमत - 17,999 रुपये