मुंबई : तुम्ही जेव्हा एखाद्या शॉपिंग सेंटर्स अथवा मॉलमध्ये शॉपिंग करण्यासाठी जाता तेव्हा वस्तूंच्या किंमती नेहमी ९९, १९९ अशा असतात. मात्र तुम्हाला माहित आहे का अशा किंमती ठेवण्यामागचं लॉजिक. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामागेही सायकॉलॉजिकल कारण आहे. जेव्हा एखाद्या वस्तूंची किंमत विषम अंकावर म्हणजेच ९ अंकावर संपते तेव्हा ती वस्तू स्वस्त असल्याचा विचार ग्राहकाच्या डोक्यात येतो. म्हणजे एखादी वस्तू २०० रुपयांची आहे असे सांगितले तर तुम्हाला ती महाग वाटेल मात्र तीच वस्तू १९९ रुपयांत मिळत असल्याचे सांगितले तर तुम्ही म्हणाल स्वस्त आहे. 


लोकांची हीच मेंटॅलिची लक्षात घेता मॉलमध्ये अथवा शॉपिंग सेंटर्समध्ये वस्तूंच्या किंमती ९९, १९९ ठेवल्या जातात. तसेच अशा पद्धतीने जाहिरात करण्याची पद्धत ही काही नवीन नाहीये. १८८०मध्ये वस्तूंच्या किंमती अशा पद्धतीने ठेवल्या जात.