ही वेबसाईट सांगेल कोणत्या एटीएममध्ये आहे कॅश
सध्या देशभरात विविध एटीएममध्ये लांबच लांब रांगा लागल्या. नोटांच्या तुटवड्यामुळे अनेकांना रांगेत उभे राहूनही पैसे मिळत नाहीयेत. एटीएमच्या बाहेर लागणाऱ्या रांगा कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत.
मुंबई : सध्या देशभरात विविध एटीएममध्ये लांबच लांब रांगा लागल्या. नोटांच्या तुटवड्यामुळे अनेकांना रांगेत उभे राहूनही पैसे मिळत नाहीयेत. एटीएमच्या बाहेर लागणाऱ्या रांगा कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत.
अशात जे लोक ऑफिसात बसून संध्याकाळी उशिरापर्यंत काम करतात त्य़ांना एटीएमबाहेर मोठमोठ्या रांगात उभे राहणे त्रासदायक ठरतेय. एटीएमबाहेरच्या रांगा रात्री उशिरापर्यंत कमी होत नाहीयेत. जेव्हा पहावं तेव्हा लोक एटीएमच्या बाहेर उभे असलेले दिसतायत. या समस्येतून सुटका मिळवम्यासाठी सीएमएस अर्थात कॅश मॅनेजमेंट अँड पेमेंट सॉल्यूशन या कंपनीने एक असे पेज डेव्हलप केलेय ज्यामुळे कोणत्या एटीएममध्ये कॅश आहे हे समजू शकते.
CMS ATM Finder या साईटवर जाऊन तुम्ही कोणत्या एटीएममध्ये कॅश आहे हे जाणून घेऊ शकता. दरम्यान, देशातील 55,000 एटीएमची माहिती या साईटद्वारे तुम्हाला मिळू शकते. इतकंच नव्हे तर यूजर्सला कोणत्या एटीएममध्ये पैसे आहेत याबाबतचा अलर्टही मिळतो.