जन्ममहिन्यानुसार कोणत्या व्यक्ती असतात अधिक रोमँटिक
तुमचा जन्म कोणत्या महिन्यात याचा प्रभाव तुमच्या जीवनावर पडतो. केवळ स्वभावच नव्हे तर प्रेमसंबंध तसेच प्रेमाबाबतचे तुमचे विचार यावरही प्रभाव असतो.
मुंबई : तुमचा जन्म कोणत्या महिन्यात याचा प्रभाव तुमच्या जीवनावर पडतो. केवळ स्वभावच नव्हे तर प्रेमसंबंध तसेच प्रेमाबाबतचे तुमचे विचार यावरही प्रभाव असतो.
जानेवारी - या महिन्यात जन्म घेतलेल्या व्यक्ती प्रेमाच्या प्रकरणात थोड्या हट्टी असतात. आपली रिलेशनशिप अधिक दृढ करण्यासाठी हे नवीननवीन क्लृप्त्यांचा वापर करतात. या महिन्यातील महिला मात्र प्रेमाच्या बाबतीत थोड्या उदासीन असतात.
फेब्रुवारी - या व्यक्ती रोमँटिक असतात. तसेच प्रेमाच्या बाबतीत उत्साही असतात. या महिन्यातील मुलींना मात्र प्रेम जाहीर करणे जमत नाही.
मार्च - मार्च महिना हा ज्यांचा जन्ममहिना आहे अशा व्यक्ती प्रेमसंबंधाबाबतीत विश्वासू असतात. या महिन्यातील मुलींमध्ये एकच कमतरता असते ती म्हणजे या मुलींना प्रेम जाहीर करणे कठीण वाटते.
एप्रिल - एप्रिल महिन्यातील व्यक्ती उत्साहवर्धक असतात. एखाद्यावर प्रेम केल्यास ते शेवटपर्यंत निभावतात. त्यामुळेच यांचे वैवाहिक जीवन सुखी असते. एप्रिल महिन्यात जन्माला आलेल्या मुली नेहमी हसमुख आणि प्रेमळ असतात. प्रेमाच्या बाबतीत मात्र हट्टी असतात.
मे - मे महिन्यात ज्यांचा जन्म झालाय अशा व्यक्ती खुलेपणाने प्रेम जाहीर करतात. दरम्यान, मुली मात्र लाजाळू असतात. अशा व्यक्तींचे वैवाहिक जीवन सुखी असते.
जून - जून महिन्यातील व्यक्तींचा स्वभाव थोडा रागीट असतो मात्र मनातून ते प्रेमळ असतात. प्रेमाच्या बाबतीतही बिनधास्त असतात.
जुलै - जुलै महिन्यात जन्म घेणाऱ्या व्यक्ती भावूक तसेच इमानदार असतात. प्रेमाच्या बाबतीत यांचे जोडीदाराशी चांगले जमते. त्यामुळे या महिन्यातील व्यक्तींचे दाम्पत्य जीवन सुखी असते.
ऑगस्ट - ऑगस्ट महिन्यातील व्यक्ती या आपल्या जोडीदाराची काळजी घेणाऱ्या असतात.
सप्टेंबर - सप्टेंबर महिन्यात ज्यांचा जन्म झालाय त्या व्यक्ती जोदीदाराप्रती भावूक असतात. जोडीदाराच्या सुख दुखाची नेहमी काळजी घेतात.
ऑक्टोबर - ऑक्टोबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती रोमँटिक असतात. प्रेमाच्या बाबतीत या व्यक्ती मूडी असतात.
नोव्हेंबर - नोव्हेंबर महिन्यातील व्यक्तींना प्रेमात रोमान्स तसेच नावीन्य आवडते.
डिसेंबर - डिसेंबर महिन्यातील व्यक्तींचे दाम्पत्यजीवन साधारणपणे चांगले असते. प्रेमाच्या बाबतीच यांचे विचार सकारात्मक असतात. जोडीदाराच्या भावनांचा नेहमी सन्मान करतात.