जळगाव : महाराष्ट्राच्या सुपुत्राने परदेशात आपल्या शैक्षणिक कतृत्वाच्या जोरावर ठसा उमटवला आहे. रसायनशास्त्रात सीजीपीए ही ग्रेड मिळवल्याने त्याच्या गौरव करण्यात आला आहे. ही ग्रेड मिळवणारा भारतात दुसरा तर महाराष्ट्रात तो पहिला विद्यार्थी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रदीप नाहीदे याने जळगावातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. ए. जे कॉलेजमधून त्याने बीएसी रसायनशास्त्रात पूर्ण केलं नंतर पुण्याच्या फर्ग्यूसन कॉलेजला एम.एससी पूर्ण केलं. सोबतच पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटेरीत त्याने प्रकल्प पूर्ण केला. मेक्सिकोमध्ये सध्या प्रदीप पुढचं शिक्षण घेतोय. गुआनज्युतो विद्यापीठातून डॉ. सिसर अल्बार्डो यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप पीएचडी पूर्ण करतोय. रसायनशास्त्रात त्याने सीजीपीए ही ग्रेड मिळवली आहे. याआधी देशातून आंध्रप्रदेशातील एका विद्यार्थाने ही ग्रेड मिळवली होती.


मॅक्सिकन सरकारकडून प्रदीपला शिक्षण पूर्ण करण्यासाठी स्कॉलरशिप मिळणार आहे. अमेरिकेच्या पेनसिल्व्हानिया या आंतरराष्ट्रीय विद्यापीठातून तो रिसर्च करणार आहे. व्हिजिटींग स्कॉलर म्हणून त्याची निवड करण्यात आली आहे.


प्रदीप आठवीत असतांनाच त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर प्रदीपच्या आईने पेन्शनवर दोन्ही मुलांना शिकवलं. प्रदीपचा मोठा भाऊ इंजिनिअर आहे आणि चेन्नईला कार्यरत आहे.  


मेहनतीचा गौरव झाला याचा एक भारतीय म्हणून अभिमान असल्याचं प्रदीपने म्हटलं आहे. शास्त्रज्ञ होऊन केमिकल रिसर्चला पुढे न्यायचंय आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत शाळा सुरु करण्याची प्रदीपची इच्छा आहे.