नोटबंदीनंतर ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर
नोटबंदीचा प्रभाव आता विविध वस्तू बनवणाऱ्या कंपन्यांवर देखील
नवी दिल्ली : नोटबंदीचा प्रभाव आता विविध वस्तू बनवणाऱ्या कंपन्यांवर देखील पाहायला मिळत आहे. कंपनी टीव्ही, फ्रिज यासारख्या वस्तूंवर शानदार ऑफर देत आहेत. नोटबंदीनंतर ग्राहक अशा वस्तू खरेदी करण्यासाठी कमी प्रमाणात येत आहेत. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या जानेवारी २०१७ मध्ये पैसे देण्याची ऑफर देत आहेत. बाय नाऊ आणि पे इन २०१७, आता खरेदी करा आणि पैसे २०१७ मध्ये द्या अशी ऑफर सुरु आहे.
ग्राहक जर इएमआयवर वस्तू विकत घेतो तर त्याला पुढच्या वर्षी म्हणजेच जानेवारी २०१७ नंतर पेमेंट द्यावा लागेल. सॅमसंग कपनीने देखील म्हटलं आहे की, लग्नासाठी होणाऱ्या खरेदीमध्ये घट झाली आहे. व्हर्लपूल ऑफ इंडियाच्या एका अधिकाऱ्याने म्हटलं की, फेस्टिव आणि वेडिंग सीजनसाठी ते चांगले ऑफर आणणार आहेत.
फेस्टिव सीजनमध्ये सेल वाढला पण नोटबंदीचा परिणाम दिसत आहे. मोबाईल फोन मार्केटवर देखील नोटबंदीचा परिणात दिसतोय. रोख रक्कम कमी असल्याने ग्राहकांचा खरेदीकडे कल सध्या कमी आहे. मोबाईल देखील ग्राहकांना शुन्य डाऊनपेमेंटवर देण्यात येत आहे. जवळ कमी पैसे असल्याने रोजच्या लागणाऱ्या गरजेच्या वस्तू लोकं फक्त खरेदी करत आहेत. फोनच्या इएमआयवरवर व्याज देखील नाही घेतलं जात आहे. अशा विविध ऑफर देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत आहे.