मुंबई : मोटोरोलाचा नवा जबरदस्त स्मार्टफोन बाजारात येत आहे. याफोनमध्ये कॅमेऱ्याचा हटके लूक असून त्यात बदल करण्यात आलाय. तसेच यात नवीन फिचर्स असण्याची शक्यता आहे.


मोटो जी-४


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘मोटोरोला’ने आपले दोन नवीन स्मार्टफोन बाजारात आणण्यासाठी तयारी केली आहे. मोटो जी-३ आणि मोटो जी टर्बो हे दोन फोन बाजारात उतरविले होते. यांना चांगली मागणी आली. त्याता त्यापुढे जात मोटोने ‘मोटो जी-४’ या अत्याधुनिक स्मार्टफोन लॉन्च करण्याचे ठरविलेय.


फिंगरप्रिंट स्कॅनर 


मोटो जी-४ बाजारात दाखल होण्याआधीच त्याचे फिचर्स लिक झालेत. या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आल्याचे समजते. समोर आलेल्या माहितीनुसार मोटोरोला कंपनी ‘मोटो जी-४’ आणि ‘जी-४ प्लस’ हे दोन नवीन ढासू स्मार्टफोन याच वर्षी बाजारात आणणार आहेत.


कॅमेरा रचनेत बदल


'विबो' या चीनी सोशल मीडिया अकाऊंटवर मोटोरोलाच्या नव्या स्मार्टफोनची छायाचित्रे व्हायरल झालीत. मोटो ‘जी-४’च्या होम बटणाला फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आलाय. मोटोरोलाने आपल्या नव्या मॉडेलमध्ये कॅमेराची रचना पहिल्या स्मार्टफोनपेक्षा वेगळी ठेवलेय.