मुंबई : मोटोरोला कंपनीचा सर्वात शानदान स्मार्टफोन Moto x Forceवर घसघसीत सूट देण्यात येत आहे. ही सूट ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर देण्यात आलेय. १६ हजार रुपायांपर्यंत सूट देण्यात आलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा स्मार्टफोन ५.४ इंच असून क्वाड एचडी डिस्प्ले आहे. फोनमध्ये २१ मेगापिक्सल रिअर आणि ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. मोटो फोर्समध्ये मायक्रो एसडी कार्डचा उपयोग करु शकता. मेमरी २ टीबीपर्यंत वाढवू शकता.


या स्मार्टफोनमध्ये ३२ जीबी आणि ६४ जीबी वॅरिएंटवर १६ हजार रुपयांची सूट मिळत आहे. हा फोन फेब्रुवारी महिन्यात लॉन्च झाला होता. ३२ जीबी वॅरिएंटची किंमत ४९,९९९ रुपये तर ६४ जीबीची ५३,९९९ रुपये किंमत होती. अनुक्रमे १५ हजार आणि १६ हजारांची सूट देण्यात येत आहे. तसेच मोटो जी (जेन ३) वर १००० रुपयांची सूट देण्यात येत आहे. हा फोन आता ९९९९ रुपयांत खरेदी करता येणार आहे.


मोटो एक्स फोर्सची फीचर्स


- 5.4 इंचचा QHd डिस्प्ले स्क्रीन (रेझोल्यूशन 1440×2560 पिक्सल)
- 2GHz चा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर
- 3 जीबीची रॅम
- मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 2 टीबी पर्यंत मेमरी वाढवू शकता
- क्विक चार्जिंग सपोर्ट  
- 21 मेगापिक्सल रियर कॅमेरा
- सेल्फीसाठी 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
- एंड्रॉयड 5.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टम
डुअल सिम  
- 4जी एलटीई, 3जी, सीडीएमए, वाय-फाय आदी फीचर्स