रिलायंस जिओबाबत होणार मोठी घोषणा
रिलायंस जिओ संबंधित होणार मोठी घोषणा
मुंबई : रिलायंस जिओ संबंधित गुरुवारी एक मोठी घोषणा होऊ शकते. रिलायंस इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी गुरुवारी दुपारी दीड वाजता मोठी घोषणा करणार आहेत. पण ती घोषणा काय असेल ते अजून गुलदस्त्यातच आहे.
जिओची फ्री सेवा ऑफर ३१ डिसेंबरपर्यंत होती. त्याबाबत काही घोषणा होऊ शकते. ही सेवा मार्चपर्यंत मोफत होऊ शकते अशा देखील चर्चा आहे. रिलायंसने आधी म्हटलं होतं की, डिसेंबरनंतर प्लान पॅकेज जाहीर केले जाणार आहेत. दुपारी दीड वाजता मुकेश अंबानी लाईव्ह ही घोषणा करणार आहेत. लाइव्ह स्ट्रिमिंग कंपनीच्या सोशल मीडिया चॅनेल्सवरुन केली जाणार आहे.