नवी दिल्ली : गुगलकडून विशेष डुडल बनवून भारतीय लेखक प्रेमचंद यांना यांना वाहण्यात आली. मुन्शी प्रेमचंद यांच्या यांची आज १३६ वी जयंती आहे. प्रेमचंद यांनी १९३६ मध्ये लिहिलेल्या गोदान या कादंबरीतील डुडलसाठी प्रेरणा घेण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रेमचंद यांच्या गोदान या कादंबरीमुळे गुगलवर शेती आणि शेतकरी सारखा विषय झळकला आहे, वास्तविक पाहता आजच्या आधुनिक जीवन शैलीत आणि इंटरनेट जगतात शेती आणि शेतकरी या विषय सध्या तरी दुर्लक्षित झाला आहे.


प्रेमचंद यांनी तेराव्या वर्षापासून लिखाणास सुरवात केली. प्रेमचंद यांनी आपल्या कारकिर्दीत तीनशेपेक्षा जास्त अधिक कथा, कादंबऱ्या लिहिल्या आहेत. प्रेमचंद हे शिक्षक म्हणून कार्यरत होते. प्रेमचंद यांचं लिखाण हिंदी भाषेत आहे.


 प्रेमचंद यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक लघु कथा, कादंबरी लिहिल्या. मुन्शी प्रेमचंद यांच्या लिखाणात गावाकडील गोष्टींचा उल्लेख असे,  त्यामुळे गुगलने डुडलमध्येही शेती, गावकडील घरे दाखविण्यात आली आहेत. मुन्शी प्रेमचंद यांचा ३१ जुलै १८८० मध्ये उत्तर प्रदेशातील लाम्ही येथे जन्म झाला होता.