मोदींचा `मन की बात` कार्यक्रम लोकप्रिय, या राज्यात सर्वाधिक श्रोते
येत्या 26 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तिसावा `मन की बात` हा कार्यक्रम देशभरात लोकप्रिय आहे. पण विशेष बिहारमध्ये मोदींची `मन की बात`चे सर्वाधिक श्रोते आहेत.
नवी दिल्ली : येत्या 26 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तिसावा 'मन की बात' हा कार्यक्रम आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येणार आहे. जनतेशी थेट संवाद साधण्याची पंतप्रधानांची ही अनोखी पद्धत देशभरात अनेक राज्यात चांगलीच लोकप्रिय आहे. पण विशेष नितीश कुमारांच्या बिहारमध्ये मोदींची 'मन की बात'चे सर्वाधिक श्रोते आहेत.
त्या खालोखाल गुजरात, आणि मध्यप्रदेशात हा कार्यक्रम ऐकला जातो. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधानांनी सांगितलेल्या लोकोपयोगी योजनांची अमंलबजाणी करण्यात मणिपूर सर्वात आघाडीवर आहे.
'मन की बात' या कार्यक्रमासाठी आकाशवाणीनं जानेवारी ते मार्च दरम्यान तीस राज्यात 6 हजार जाणांची मत जाणून घेतलं. त्यातूनही ही माहिती पुढे आलीय. या सर्वेक्षणातून पुढे आलेल्या निष्कर्षनुसार सरासरी 40 लाख लोक पंतप्रधानांचा 'मन की बात' कार्यक्रम ऐकतात. त्यात देशात पूर्वेकडे कार्यक्रमाच्या श्रोत्यांची संख्या सर्वाधिक असल्याचं पुढे आले आहे तर उत्तर आणि मध्य भागात 'मन की बात' लोकप्रिय आहे.