मुंबई : सध्या सोशल मीडियाची क्रेझ आहे. एखादी बातमी किंवा गोष्ट लगेच व्हायरल होते आणि त्याचा बोलबाला होतो. मात्र, व्हॉटस्‌अॅपची तुम्हाला नवीन फिचर्स माहीत आहेत का? व्हॉटस्‌अॅपने आणखी काही नवीन फिचर्स अॅड केली आहेत. त्यामुळे तुम्हाला पसंत असतील तेच मेसेज ठेवू शकता तसेच स्टार मार्क करुन वेळ मिळेल तेव्हा ते संदेश वाचू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


व्हॉटस्‌अॅपने आपले युजर वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु केले आहेत. 'व्हॉटस्‌अॅप'द्वारे आता लवकरच पीडीएफ फॉरमॅटमधील फाईल पाठविणे शक्‍य होणार आहे. इन्स्टंट मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून संदेशांद्वारे टेक्‍स्ट, फोटोज्‌, व्हिडिओज्‌ आणि फोन क्रमांकही पाठविता येतो. मात्र अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचे डॉक्‍युमेंट पाठवण्याची सोय नव्हती, ती सेवा आता व्हॉटसअॅपद्वारे देण्यात येणार आहे.



व्हॉटस्‌ अॅपच्या पुढील अपडेटेड व्हर्जनमध्ये ही सुविधा उपलब्ध असणार आहे. मात्र हे व्हर्जन अद्याप अधिकृतरित्या उपलब्ध झालेले नाही. लवकरच ते गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध होईल. त्यानंतर त्याबाबतची सूचना व्हॉटस्‌ अॅपद्वारे येणार आहे.



दरम्यान, व्हॉटस्‌अॅपने आणखी काही नवीन फिचर्स अॅड केली आहेत. त्यामुळे तुम्हाला पसंत असतील तेच मेसेज ठेवू शकता तसेच स्टार मार्क करुन ठेवलेले मेसेज वेळ मिळेल तेव्हा वाचू शकता. तुम्हाला पसंत नसतील ते मेसेज डिलीट करण्याची व्यवस्था केवळ डेस्कटॉपवर देण्यात आली आहे. तर अन्य सेवा या मोबाईल युजर्ससाठी आहेत. डेस्कटॉपवरुन याआधी मेसेज डिलीट करता येत नव्हते. ती सेवा व्हाट्सअॅपने दिलेय. तसेच मोबाईल धारकांसाठी किती दिवसांचे मेसेज ठेवायचे आणि ते डिलीट करावयाचे ऑप्शन दिलेय.