नवी दिल्ली : व्हॉटसअॅपवर बंदी घालता येणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे व्हॉटसअॅपला वापरणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हॉट्‌सअॅपवर बंदी आणण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात हरियाणातील माहिती आधिकारी कार्यकर्ते सुधीर यादव यांनी  याचिका दाखल केली होती. 


व्हॉट्‌सऍपवरील एंड-टू-एंड इन्क्रिप्शन दहशतवाद्यांना संवाद साधणे अधिक सोपे झाले आहे, यामुळे व्हॉट्‌सअॅपवर बंदी आणावी, अशी मागणी यादव यांनी याचिकेद्वारे केली होती.


 सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने या याचिकेवर बुधवारी सुनावणी केली. त्यामध्ये 'व्हॉटसअॅपटवर बंदी आणता येणार नसल्याचे म्हटले आहे. 


म्हणजेच व्हॉटसअॅपवरील तुमचा संवाद अधिक सुरक्षित


व्हॉट्‌सअॅपने एप्रिल महिन्यापासून सुरू केलेल्या सुविधेमुळे प्रत्येक मेसेज 256-बिट एन्क्रिप्शनमधून जात असल्याने तो फोडून वाचणे अवघड झाले आहे. 


हे कोडेड मेसेज ब्रेक करणे 'सुपर कॉम्प्युटर'लाही अशक्‍य आहे, तसेच 256-बिट एन्क्रिप्टेड असलेला एक संदेश तोडून समजून घेण्यास अनेक वर्षं लागत असल्याचेही याचिकेत म्हटले आहे.


असा मेसेज फक्त मेसेज पाठविणारा आणि मेसेज स्वीकारणाराच वाचू शकत असल्याने याचा वापर करून दहशतवादी कारवायांसाठी करू शकतील, असे याचिकेत म्हटले होते.


विशेष म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा एखादा संदेश सरकारला हवा असल्यास व्हॉट्‌सअॅप स्वत:ही तो प्राप्त करू शकत नसल्याने हे धोकादायक आहे. अशा मेसेजवर भारताच्या गुप्तचर खात्यालाही लक्ष ठेवणे अशक्‍य असल्याने बंदीची मागणी केली जात होती.