अरेंज मॅरेजवर विश्वास नाहीये तर हे जरुर वाचा...
अरेंज मॅरेजबाबत खासकरुन तरुणांची अशी धारणा असते की अशा लग्नांमध्ये जोडपे सुखी राहू शकत नाही. तुम्ही ज्याला ओळखत नाही त्याला एका किवां दोन भेटीमध्ये कसा काय होकार द्यायचा. संपूर्ण आयुष्य ज्या माणसासोबत काढायचे आहे त्याला एक अथवा दोन भेटीत कसे काय ओळखायचे असे ना ना प्रश्न तरुणांच्या मनात येतात.
मुंबई : अरेंज मॅरेजबाबत खासकरुन तरुणांची अशी धारणा असते की अशा लग्नांमध्ये जोडपे सुखी राहू शकत नाही. तुम्ही ज्याला ओळखत नाही त्याला एका किवां दोन भेटीमध्ये कसा काय होकार द्यायचा. संपूर्ण आयुष्य ज्या माणसासोबत काढायचे आहे त्याला एक अथवा दोन भेटीत कसे काय ओळखायचे असे ना ना प्रश्न तरुणांच्या मनात येतात.
अरेंज मॅरेजबाबत शाहीद कपूरचेही असेच काहीसे विचार होते. मात्र मीराशी लग्न झाल्यावर त्याचे विचार पूर्णपणे बदलले. काही दिवसांपूर्वीच कॉफी विद करणमध्ये शाहीद आणि त्याची पत्नी मीरा आले होते. यावेळी दोघांनी अरेंज मॅरेजबाबत अनेक सकारात्मक गोष्टी सांगितल्या. अरेंज मॅरेज यशस्वी होण्यामागची कारणेही सांगितली.
दोघांमधील केमिस्ट्री - लग्न यशस्वी होण्यासाठी दोघांमधील केमिस्ट्री जुळणे अत्यंत आवश्.क असते. ही गोष्ट शाहीद आणि मीराच्या जोडीमध्ये प्रकर्षाने जाणवते. शोमध्येही त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहायला मिळाली.
एकमेकांबद्दल काळजी - शोदरम्यान मीराने हे मान्य केलं की शाहीद तिची खूप काळजी घेतो त्यामुळेच त्यांचे नाते अधिक फुलत गेलंय.
विश्वास महत्त्वाचा - कोणत्याही नात्यात विश्वास असणे गरजेचे असते. आपल्या जोडीदारावरील विश्वास नात्यात कोणताही कटूपणा येऊ देत नाही. मीरा आणि शाहीदचेही असेच म्हणणे होते की कोणत्याही परिस्थिती तुमचा तुमच्या जोडीदारावरील विश्वास कायम हवा.
नात्यात मैत्री गरजेची - अरेंज मॅरेजमध्ये नवरा-बायको होण्याआधी एकमेकांचे मित्र होणे गरजेचे असते. शाहीद-मीराही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यामुळेच त्यांच्यातील संवादही खुलेपणाने होतो.
सासरच्या लोकांशी ताळमेळ साधणे - कॉफी विथ करण या शोमध्ये मीराने सांगितले की सासरचे लोक तिच्यावर फार प्रेम करतात. त्याचप्रमाणे त्यांच्या प्रत्येक गोष्टीत ते दखल देत नाहीत. यामुळे नात्यात क़डवटपणा येत नाही.