मुंबई : गुगल मॅपवर मल्टिस्टॉप डायरेक्‍शन सेवा उपलब्ध झाली आहे, सुरूवातीला अँड्राइड यूजर्सना ही सुविधा मिळणार आहे. यासाठी तुम्हाला गुगल मॅपचे लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करावे लागेल. गुगलने अँड्राइड मोबाईलधारकांसाठीही उपलब्ध केल्याने प्रवास आणखी सुखकर होणार आहे.  आतापर्यंत केवळ डेस्कटॉपवर उपलब्ध होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वीच गुगलने यूजर्सना त्यांच्या प्रवासातील 'पिट स्टॉप' मॅपवर अॅड करण्याची सुविधा दिली होती, परंतु यामध्ये केवळ पेट्रोल पंप, दुकाने आणि महत्त्वाच्या ठिकाणांचाच समावेश करता येत होता. त्यामुळेच आता गुगलने मल्टिस्टॉप डायरेक्‍शनची सुविधा आणली आहे. या सुविधेमुळे छोट्या छोट्या गावांचे स्टॉप्सही प्रवासात घेता येणार असून, प्रवाशांना आपल्या मार्गाने देश पाहण्यास मदत होणार आहे. 


आता पाहा थांब्यासह मोबाईलवरही पाहा गुगल मॅप्स
गुगल मॅपमध्ये स्टार्ट आणि एंड पॉइंट टाकल्यानंतर कोपऱ्यातील मेन्यूवर क्‍लिक करा. 
तुम्हाला 'एंडिंग स्टॉप्स' असा पर्याय दिसेल. 
एक किंवा अनेक थांबे तुम्हाला टाकता येतील. 
थांब्यांची तुम्ही नव्याने नमूद करू शकतात
तुमचे थांबे आणि डेस्टिनेशन कळल्यानंतर गुगलकडून तुम्हाला सर्वांत जवळचा मार्ग लगेच कळवला जातो.