मुंबई : नोटाबंदीनंतर सर्व सामान्यांसाठी मोबाईल अॅप 'व्हॉटसअप'नं  एक गुडन्यूज दिलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून लवकर तुम्हाला पेमेंट करता येणार आहे. व्हॉट्सअॅप चॅटिंगच्या माध्यमातून लवकरच डिजिटल पेमेंट करणं शक्य होणार आहे. त्यामुळे, चॅटिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या याच अॅपचा ई-वॉलेट म्हणूनही वापर करता येणार आहे. 


वर्षाच्या अखेरपर्यंत व्हॉट्सअॅप युजर्सना ही सुविधा वापरता येणार आहे. यूपीआय आधारित डिजिटल पेमेंट सुरु करण्याची तयारी सध्या व्हॉट्सअॅपकडून सुरु असल्याची माहिती मिळतेय. याबाबत व्हॉट्सअॅप आणि 'नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया' यांच्यातही चर्चा सुरु आहे. ही नवी सुविधा 'युझर टू युझर' बेस्ड असेल. 


फेब्रुवारीत व्हॉट्सअॅपचे सह-संस्थापक ब्रायन अॅक्टन यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेतली होती. त्यावेळी डिजीटल पेमेंट सर्व्हिसबाबत दोघांमध्ये चर्चा झाली होती. 


पेटीएम, भीम अॅप, फ्री-चार्ज, मोबिविक अशी ई-वॉलेट्स आणि डिजिटल पेमेंट करणारी अॅप्स भारतात लोकप्रिय आहेत. मात्र, आगामी काळात व्हॉट्सअॅप यांना तगडी टक्कर देण्याची चिन्हं आहेत.