माऊंटेन व्ह्यु : व्हॉटसअॅप वापरणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. 'व्हॉटस्‌अॅप'द्वारे आता लवकरच पीडीएफ फॉरमॅटमधील फाईल पाठविणे शक्‍य होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इन्स्टंट मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून संदेशांद्वारे टेक्‍स्ट, फोटोज्‌, व्हिडिओज्‌ आणि फोन क्रमांकही पाठविता येतो. मात्र अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचे डॉक्‍युमेंट पाठवण्याची सोय नव्हती, ती सेवा आता व्हॉटसअॅपद्वारे देण्यात येणार आहे.


व्हॉटसअॅपच्या स्पर्धेत असलेल्या इतर इन्स्टंट मेसेंजिंग अॅपमध्ये ही सुविधा आहे. त्यालाच टक्कर म्हणून 'व्हॉटस अॅप'ही पीडीएफ फाईल पाठविण्याची सेवा देऊ केली आहे. पीडीएफशिवाय आता पुढील काळात आणखी नवी सेवा व्हॉटस अॅप देणार का? याकडेही लक्ष आहे.


व्हॉटस्‌ अॅपच्या पुढील अपडेटेड व्हर्जनमध्ये ही सुविधा उपलब्ध असणार आहे. मात्र हे व्हर्जन अद्याप अधिकृतरित्या उपलब्ध झालेले नाही. लवकरच ते गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध होईल. त्यानंतर त्याबाबतची सूचना व्हॉटस्‌ अॅपद्वारे येणार आहे.