मुंबई : मोबाईल कंपन्या आपल्या युजर्सला आकर्षित करण्यासाठी वेगवगळ्या योजना आणत असते. मात्र, काहीवेळा नेट पॅक वापरण्याबाबत मुदत असते. आता ही मुदत तुम्हाला असणार नाही. तुम्ही वर्षभर डाटा पॅक वापरु शकणार आहात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या ग्राहकांना इंटरनेट वापरास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) नेटपॅकची वैधता 365 दिवसांपर्यंत वाढविण्यास मान्यता दिली आहे. 


ट्रायच्या नियमानुसार सध्या केवळ जास्तीत जास्त 90 दिवसांपर्यंतची वैधता असलेले विविध नेटपॅक्‍स उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रीपेड ग्राहकांना 90 दिवसांतून किमान एकदा रिचार्ज करणे अनिवार्य होते. इंटरनेटचा नियमित वापर करणाऱ्या ग्राहकांना या समस्येला सामोरे जावे लागत होते. या जाचापासून सुटका होणार आहे.


मोबाईलवरील डेटापॅक्‍सची वैधता जास्तीत जास्त 365 दिवसांची करण्यात आली आहे. ट्रायने टेलिकॉम दूरसंचार ग्राहक नियमन कायद्यातील (टीसीपीआर) दहाव्या दुरुस्तीनुसार ही वैधता 365 दिवसांपर्यंत करण्यात आली आहे. 


अनेक मोबाईल कंपन्या इंटरनेट किंमतीनुसार आणि सेवेनुसार डेटापॅक उपलब्ध करुत देतात. त्यामध्ये साधारण 50 एमबी आणि एका दिवसाच्या वैधतेपासून या पॅक्‍सना सुरुवात होते. तर वैधता जास्तीत जास्त 90 दिवसांपर्यंत होती. आता 365 दिवसांच्या वैधतेमुळे अधिक एमबी डेटा मिळणार असून त्याप्रमाणे किंमतही वाढणार आहे.