आफ्रिदीच्या मुलीच्या मृत्यूच्या बातमी मागचं सत्य
पाकिस्तानचा धडाकेबाज क्रिकेटर बुम बुम आफ्रिदी सध्या मीडियात चर्चेत आहे.
मुंबई : पाकिस्तानचा धडाकेबाज क्रिकेटर बुम बुम आफ्रिदी सध्या मीडियात चर्चेत आहे. आफ्रिदीविषयी एक वाईट पोस्ट सोशल नेटवर्किंगवर फिरत आहे. सोशल नेटवर्किंगवर अशी बातमी आली आहे की, शाहिद आफ्रिदीची मुलगी असमाराचा मृत्यू झाला. मात्र ही एक अफवाच असल्याचं समोर येतंय, शहानिशा किंवा विचार न करता व्हॉटसअॅपवरील पोस्ट पुढे पाठवली तर काय आणि कसा अनर्थ होतो ते पुढे वाचा...
व्हॉटसअॅपवरील पोस्टला आई-बाप नसतात...
व्हॉटसअॅपवरील पोस्टला आई-बाप नसतात असं म्हणतात, म्हणून व्हॉटसअॅपवर शाहिदच्या मुलीच्या मृत्यूची बातमी फिरत होती. लोकांच्या मोठ्या प्रमाणावर सहानुभूतीच्या प्रतिक्रिया या पोस्टवर येत होत्या.
तीन आठवड्या आधीचा फोटो
शाहिद आफ्रिदीने काही दिवसांपूर्वी ट्वीटरवर हा फोटो टाकला होता, त्याची मुलगी असमारा तेव्हा आजारी होती, तो हॉस्पिटलमध्ये तिच्याजवळ असताना त्याने तो फोटो काढला होता, आणि शेअर करताना खाली लिहिलं होतं...
'Get Well Soon ASMARA ! Ameen'
व्हॉटसअॅपवर अफवा पसरवणारे पुराव्यांसह पकडले जातात
मात्र असमाराच्या मृत्यूवर कोणतंही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही. मात्र आफ्रिदीने सोमवारी एक फोटो शेअर केला, यात असमाराची तब्येत बिल्कुल ठिक आहे. आपल्या मुलीला तो पाहतोय, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर मास्क लावला आहे.
ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर असमारा अतिशय सुरक्षित असल्याची पोस्ट देखील व्हायरल होत आहे. कुणीतरी यापूर्वी शाहिद आफ्रिदीच्या मुलीचा कॅन्सरने मृत्यू झाल्याची बातमी पसरवली होती.
व्हॉटसअॅपवर अफवा पसरतात, व्हॉटसअॅपच्या पोस्टला आईवडील नसतात असं म्हणतात, पण अफवा पसरवणारे पोलिसांच्या कचाट्यातून वाचू शकत नाहीत.