मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी आणल्यानंतर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तसेच पेटीएमचा वापर करण्याचे प्रमाण मोठे वाढलेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोटाबंदीनंतर पेटीएमने एका दिवसांत तब्बल 120 कोटीहून अधिक रुपयांचा व्यवहार केल्याची माहिती कंपनीने दिलीये. नोटांवर बंदी आणल्यानंतर अनेकांनी ऑनलाईन शॉपिंग तसेच पेटीएमचा वापर सुरु केला. 


500 आणि 1000च्या नोटांवर बंदी आणल्यानंतर दहा दिवसात 4.5 कोटी ग्राहकांनी पेटीएमचा वापर केला. यात 50 लाख नव्या ग्राहकांचा समावेश आहे. सध्या पीटीएमचे 15 कोटी यूझर्स आहेत.


पेटीएमचे हे अॅप तुम्ही गुगल प्ले स्टोर अथवा आयट्यून्सवरुन डाऊनलोड करु शकता.